सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’मधील पहिले गाणे रिलीज


लवकरच ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा येणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात वरूण शर्मा आणि सिंगर बादशाहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे कोका असे शीर्षक आहे. सोनाक्षीचा खास डान्स २ मिनीट ५३ सेकंदाच्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. तर गाण्यात बादशाह आणि वरूण शर्मा यांचीही झलक पाहायला मिळत आहे. जसबीर जस्सी, बादशाह आणि ध्वनी भानुशाली यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित सोनाक्षीचा खानदानी शफाखाना हा चित्रपट आहे. २ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी असल्याने या चित्रपटात प्रेक्षकांना काहीसे वेगळेपण पाहायला मिळेल हे नक्की. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे.

Leave a Comment