स्मिता तांबेचे पहिल्यांदाच स्टनिंग फोटोशुट


नुकतेच एक स्टनिंग फोटोशुट चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबेने केले आहे. अभिनेत्री स्मिता तांबेने आजवर करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिका साकारल्या होत्या पण आता ती पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात या फोटोशूटमूळे पाहायला मिळत आहे.

स्मिता तांबे फोटोशूटवेळी म्हणाली, गेल्या दहा-बारा वर्षात मी अशा पध्दतीने स्वत:चे वेगळे फोटोशूट केले नाही. मी ज्या-ज्या भूमिका रंगवत गेले त्या-त्यावेळी चित्रपटातील भूमिकेनूसार, पोस्टरसाठीच केवळ फोटो काढले आहेत. त्याचबरोबर मी कधी ग्लॅमरस भूमिका न रंगवल्याने माझे कधी ग्लॅमरस फोटोसेशन माझ्या चाहत्यांसमोर आले नव्हते.

2019 मध्ये अनेक नव्या गोष्टी स्मिता तांबेच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात घडत आहेत. ती त्याविषयी विचारल्यावर म्हणाली, यंदा वर्षाच्या सुरूवातीला माझे लग्न झाले आणि त्यानंतर आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले. मी व्यावसायिक रंगभूमीवर खूप वर्षांनी इडियट्स नाटकाव्दारे परतले. सावट चित्रपटाव्दारे निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले. डिजीटल विश्वातही पदार्पण झाले. आता माझ्या एका मागोमाग एक तीन वेबसीरीज येत आहेत. त्यात बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतही खूप चांगले प्रोजक्ट्स करत आहे, ज्यांची लवकरच अनाउन्समेंटही होईल.

Leave a Comment