दोस्तानाच्या सिक्वेलमध्ये झळकणार कार्तिक-जान्हवी


प्रेक्षकांवर अद्यापही प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन अभिनीत ‘दोस्ताना’ चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रियंकाला याच चित्रपटानंतर ‘देसी गर्ल’ असे नाव मिळले होते. बॉक्स ऑफिसवर रोमॅन्टिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. या चित्रपटाचा आता सिक्वेल येणार असल्याची अधिकृत घोषणा दिग्दर्शक करण जोहरने केली आहे. त्याने सोशल मीडियावर या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याची माहितीदेखील दिली आहे.


सोशल मीडियावर करण जोहरने एक पोस्ट शेअर केली आहे. कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर ही जोडी या चित्रपटात झळकणार आहे. यातील दुसरा अभिनेता कोणता असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, त्या कलाकाराचा लवकरच खुलासा होईल, करण जोहरने हे आपल्या पोस्टमधुन सांगितले आहे.

कोलीन डी कुन्हा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, नवज्योत गुलाटी, सुमीत अरोरा आणि ऋषभ शर्मा हे या चित्रपटाच्या कथानकावर काम करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी आणि कार्तिकची फ्रेश जोडी झळकणार असल्याने त्यांच्यासोबत आता दुसरा कोणता कलाकार असेल, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Leave a Comment