दिशा पटनीचा हा व्हिडीओ नक्कीच पाहा


बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी गेले काही दिवस अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत आहे. पण आता एका वेगळ्या कारणामुळे दिशा पटनी चर्चेत आली आहे. कारण तिने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिशाचे हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण कौतुक करत आहे.


दिशा पटनी आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते हे आपल्या सर्वांना माहित आहे. फिटनेस फ्रीकही दिशाला म्हटले जाते. आपल्या सोशल अकाऊंट्सवर वर्कआऊटचे व्हिडीओ दिशा नेहमी शेअर करत असते. ती ज्यामध्ये कधी फ्लायिंग किक, बॅक फ्लिप्स आणि इतर अनेक प्रकार करत असते.


आपल्या ट्रेनिंग दरम्यान, सिंगल हँडिंड कार्टव्हील करताना दिशाने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेकांना दिशा पटनीचा हा व्हिडीओ खूप आपडला आहे. अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही या व्हिडीओवर येत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.


इन्स्टाग्रामवर दिशा पटनीला 22.2 मिलियन लोक फॉलो करतात. दिशा आपल्या फॉलोअर्ससाठी नेहमी बोल्ड आणि सुंदर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. दिशाने काही दिवसांपूर्वी आपला 27 वा वाढदिवसही साजरा केला होता. नुकतेच ती सलमानच्या ‘भारत’ चित्रपटात दिसली होती.

Leave a Comment