‘बारामती’ला झाला होता नथुराम गोडसेंचा जन्म – मुनगंटीवार


मुंबई – विरोधकांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाबाबत हल्लाबोल केला. महात्मा गांधींऐवजी त्यांचे खुनी नथुराम गोडसेचा उदो उदो या सरकारच्या काळात केला जात असल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर पलटवार करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीला झाला असल्याचा पलटवार केल्यामुळे विरोधकांची चांगलीच ‘बोबडी’ वळली.

विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालत मुनगंटीवारांनी गोडसेंवरुन थेट ‘बारामतीकरां’वरच निशाणा साधला. खुद्द अजित पवार यांनाही मुनगंटीवार यांच्या पलटवारावर काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडला. हे आत्ताच आम्हाला माहिती झाले, एवढेच अजित पवार बोलू शकले. राज्य सरकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मात्र कार्यक्रमावर विरोधक टीका करत आहेत. विरोधकांनी या कार्यक्रमाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment