परदेशी प्रवास करत आहात का? मगसोबत ट्रॅव्हल क्रेडीट कार्ड नेणे उपयुक्त


आजकालच्या ‘कॅशलेस’ काळामध्ये आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमुळे रोख पैसे सोबत ठेवण्याची आवश्यकता कमी झाली आहे. आता क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल फोन्सवर उपलब्ध असलेली अॅप्स यांच्या सहाय्याने पैश्यांची देवघेव सोपी झाली आहे. परदेशी जाताना देखील ही सुविधा ट्रॅव्हल क्रेडीट कार्डच्या रूपाने आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पैश्याच्या देवघेवीसाठी बँकांच्या कडून उपलब्ध करविण्यात आलेली कार्ड्स दोन प्रकारची असतात. त्यातील एक क्रेडीट कार्ड तर दुसरे डेबिट कार्ड असते. ट्रॅव्हल क्रेडीट कार्डही सामान्य क्रेडीट कार्ड प्रमाणेच असून, त्यामध्येदेखील क्रेडीटची मर्यादा आधीपासूनच निश्चित केलेली असते.

ट्रॅव्हल क्रेडीट कार्ड सोबत नेण्यापूर्वी ‘करन्सी एक्स्चेंज’ बद्दलची माहिती करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या ट्रव्हल कार्डवर अधिक बोनस मिळत असेल, अश्याच कार्डची निवड करणे अधिक योग्य ठरते. त्याचप्रमाणे या कार्डसाठी वार्षिक शुल्क किती भरावे लागणार आहे हे पाहूनच कार्डची निवड करावी. परदेशी प्रवास करताना जर ट्रॅव्हल क्रेडीट कार्ड घेतले असेल, तर वेगळा ट्रॅव्हल इंस्युरन्स घेण्याची आवश्यकता पडत नाही. आजकाल बहुतेक सर्व बँक्स ट्रॅव्हल क्रेडीट कार्डच्या सोबतच ट्रॅव्हल इन्श्युरन्सही उपलब्ध करवितात. त्याअंतर्गत व्यक्तिगत दुर्घटना विमा, पारिवारिक दुर्घटना विमा, एअर अॅक्सिडंट इत्यादी समाविष्ट असतात.

ट्रॅव्हल क्रेडीट कार्डच्या अंतर्गत मल्टीपल करन्सीची सुविधा मिळते. त्यामुळे विदेश यात्रा करीत असताना आकस्मिक गरज भासली तर क्रेडीट मर्यादेच्या आतील रकमेचा उपयोग एअर तिकीट बुकिंग, हॉटेल्सची बिले, टॅक्सीसाठीचा खर्च, किंवा खरेदी या वस्तूंसाठी करता येऊ शकतो. तसेच खर्च केलेल्या रकमेवर रिवॉर्ड पॉइंट्सही मिळत असतात. जर आपल्या परदेशी यात्रा वारंवार होणाऱ्या नसतील, तर वार्षिक शुल्क कमी असलेले ट्रॅव्हल क्रेडीट कार्ड खरेदी करणे चांगले. या कार्डच्या सहाय्याने केलेल्या प्रत्येक खर्चाची माहिती ईमेल किंवा एसएमएस द्वारे सतत आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्या क्रेडीट कार्डची मर्यादा आणि आपण करीत असलेला खर्च यांचे गणित जुळविणे शक्य होते.

Leave a Comment