‘मलाल’मधील आणखी एक मराठमोळे गाणे रिलीज


शर्मिन सेहगल आणि मिजान जाफरी हे स्टारकिड्स दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या आगामी ‘मलाल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. तर, चित्रपटातील तीन गाणीदेखील आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहेत. या चित्रपटातील आणखी एक नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या गाण्यालाही चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच मराठमोळ टच आहे. या गाण्याचे आईशप्पथ तुझ्यावर प्रेम करतो, असे शीर्षक आहे. मिजान हे गाणे दिपावलीच्या दिवशी संपूर्ण चाळीतील लोकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देत गाताना दिसत आहे. मिजानच्या नृत्याचीही झलक या गाण्यामध्ये पाहायला मिळते.

हृत्विक तलाशीरकरने २ मिनीट आणि २५ सेकंदांच्या या गाण्याला आवाज दिला आहे. तर संजय लिला भन्साळी यांचे संगीत आहे. भूषण कुमार, महावीर जैन आणि संजय लिला भन्साळी यांनी मंगेश हाडवळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment