सोशल मीडियात पुन्हा व्हायरल होत आहे पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी


मुंबई : सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकी दरम्यान पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी ऑफिसर रीना द्विवेदी यांचे फोटो व्हायरल झाले होते. संपूर्ण देशात यामुळे रीना द्विवेदी यांना प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर रीना द्विवेदी यांची पुन्हा आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा नुकताच टिक-टॉकवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या ज्यामध्ये डान्स करताना दिसत आहेत. यूट्यूबवरही रीना यांचा हा व्हिडीओ अपलोड केला आहे.


रीना या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहेत. पिवळ्या रंगाचा स्कर्ट त्यांनी घातला आहे आणि घरात डान्स करताना दिसत आहे. रीना द्विवेदी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सर्वांच्या पसंतीस पडला आहे. मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रीना यांनी याशिवाय आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही डान्सचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्या त्यामध्येही पिवळ्या साडीमध्ये दिसत आहे. रीना यांच्या पिवळ्या साडीने निवडणुकीत सर्वजण त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करत होते. एका दिवसात रीना यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळाली होती. रीना या लखनऊमध्ये पीडब्लूडीमध्ये कामाला असून त्या उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे राहतात आणि त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे.

Leave a Comment