तुमचे वायफाय पासवर्ड न सांगता असे शेअर करा


सध्याच्या घडीला आपण डिजीटल युगात वावरत आहोत. त्यामुळे इंटरनेट ही सध्याच्या काळाची महत्वपूर्ण गरज आहे. आपण नेहमीच इंटरनेटच्या सानिध्यात असतो. त्यासाठी कधी आपण मोबाईल इंटरनेटचा तर कधी वायफायचा आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर आपण बऱ्याचदा आपल्या मोबाईलमध्ये उपलब्धतेनुसार वाय-फायचा वापर करतो. आपल्या घरात अनेकांनी वायफाय कनेक्शन जोडले आहेत. आपल्याला अशावेळी अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना घरातील वायफायचा पासवर्ड द्यावा लागतो. पण त्यांना आपला पासवर्ड दिल्यानंतर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. आम्ही आज तुम्हाला या अडचणीपासून तुमचा बचाव करण्यासाठी एक साधी पद्धत सांगणार आहोत. तुम्हाला या पद्धतीमुळे तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना पासवर्ड देण्याची गरज लागणार नाही आणि तुम्ही त्यांना पासवर्ड न देता वायफायसोबत कनेक्ट करु शकता.

तुमच्या वायफायचा पासवर्ड तुम्ही QR कोडच्या माध्यमातून शेअर करु शकता. यामुळे इतरांना तुमच्या वायफायचा पासवर्ड कळणार नाही. तुम्हाला वायफाय कनेक्ट करण्यासाठी तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांना QR कोड स्कॅन अॅप डाऊनलोड करावा लागेल. तुम्ही QR कोडच्या माध्यमातून पासवर्डला कसा शेअर करु शकता याची प्रक्रिया खूप सोपी आहे. हे अँड्रॉईंड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी खूप सोपे आहे.

तुमच्या वायफाय आणि पासवर्डला QR कोडमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी अनेक वेबसाईट्स आहेत. यामध्ये www.qrstuff.com आणि zxing.appspot.com/generator सारख्या प्रसिद्ध वेबसाईट्स आहेत. आम्ही सांगितलेल्या दोन्ही वेबसाईटपैकी एका वेबसाईटवर जावे लागेल. तेथे वायफाय लॉगिन किंवा वायफाय नेटवर्क पर्याय निवडावे लागेल. येथे SSID कनेक्शनमध्ये तुमच्या वायफाय नेटवर्कचे नाव टाईप करा दिलेल्या सेक्शनमध्ये पासवर्ड टाका. त्यानंतर नेटवर्क टाईप निवडा, बऱ्याचदा वायफायमध्ये WPA असते. आता QR कोड जनरेट करुन डाऊनलोडवर क्लिक करा.

तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर QR कोडची सॉफ्ट कॉपी ठेवू शकता किंवा याची प्रिंट आऊट ठेवू शकता. तुमचे मित्र किंवा नातेवाईक यामुळे सहजपणे स्कॅन करुन वायफाय कनेक्ट करु शकतात. आयफोन यूजर्सला आपला कॅमेरा अॅप ओपन करुन QR कोड स्कॅन करावा लागेल. यानंतर तुमच्याकडे नेटवर्कसोबत जोडण्यासाठी मेसेज येईल. बऱ्याचदा अँड्रॉईड फोनही आपल्या मोबाईलच्या कॅमेराने QR कोड ऑटोमॅटिक डिटेक्ट करतात. कोणत्या अँड्रॉईंड फोनमध्ये जर हे फीचर नसेल, तर यूजर गुगल प्लेस्टोअरवरुन QR कोड स्कॅनिंग अॅप डाऊनलोड करावे लागेल. तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला आपला वायफाय पासवर्ड न सांगता त्याला नेटवर्कसोबत कनेक्ट करु शकता.

Leave a Comment