दीपिकाकडे जेव्हा सुरक्षारक्षक ओळखपत्र मागतो तेव्हा…


विमानतळावर राजा असो वा रंक दोघांनाही एकसमान वागणूक मिळते. विमानतळावर कोणालाही ओळखपत्र तपासल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. अशीच वागणुक एखाद्या प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्रीलाही मिळत असेल, का असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडलेला असतो. पण दीपिकाच्या एका व्हिडिओने अलिकडेच चाहत्यांचा हा प्रश्न सोडवला आहे.

View this post on Instagram

Thy shall always obey rules 👍 #deepikapadukone

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


वडील प्रकाश पादुकोण यांच्यासोबत अलिकडेच दीपिका विमानतळावर स्पॉट झाली. विमानतळावरील सुरक्षारक्षकाने यावेळी तिला ओळखपत्र मागितले. दीपिकाचे सुरुवातीला त्याच्याकडे लक्ष नव्हते. पण सुरक्षारक्षकाने पुन्हा एकदा मागुन आवाज दिल्याने त्याची दखल दीपिकाने घेतली. तिने लगेच तिचे ओळखपत्र त्याला दाखवले आणि समोर निघुन गेली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणतीही टाळाटाळ न करता दीपिकाने ओळखपत्र दाखवले म्हणून तिचे कौतुक केले जात आहे. तर, सुरक्षारक्षकानेही त्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, त्याच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, काही युजर्सनी मात्र, दीपिकाने स्वत:हुन आयडी प्रुफ दाखवायला हवे होते, असे म्हटले आहे.

Leave a Comment