सोनाक्षी सिन्हाच्या खानदानी शफाखानाचा ट्रेलर रिलीज


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि बादशाह हे आगामी खानदानी शफाखाना या चित्रपटात झळकणार आहेत. काल या चित्रपटातचे पोस्टर रिलीज केल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यातत आला आहे. या ट्रेलरमध्ये सोनाक्षीसमोर आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी ६ महिने त्यांचे सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते. अशात सोनाक्षी कशा प्रकारे या गोष्टी हाताळते आणि यादरम्यान होणारे अनेक विनोदी संवाद पाहायला मिळतात.

नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी चित्रपटाची कथा असल्याने या चित्रपटात प्रेक्षकांना काहीसे वेगळेपण पाहायला मिळणार आहे. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment