200 कोटीच्या लग्नात कतरिनाचे ठुमके


‘भारत’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री कतरिन कैफ लवकरच आपल्याला ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. आपल्या चित्रपटांसोबतच कतरिना कैफ सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यातच नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ लाल शिमरी ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्याआधी, अभिनेत्री कतरिना कैफने फेमिना मिस इंडिया फाइनलमध्ये डान्स केला होता.


कतरिना सध्या ओली येथे होत असलेल्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेली आहे. या विवाहात कतरिना कैफने भरपूर खूप डान्स केला. कतरिना कैफच्या फॅनपेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘हुस्न परचम’ या गाण्यावर नाचत आहे. या व्हिडीओतील कतरिनाच्या डान्स स्टेप्स आणि मुव्ह्स बघण्यालायक आहेत. तिने आपल्या नृत्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांची मने जिंकली नाही तर तिने सोशल मीडियातील आपल्या चाहत्यांची देखील मने जिंकली आहेत. कतरिनाच्या या व्हिडीओमुळे ती एक चांगली एक नृत्यांगना असल्याचे सिद्ध होते.


कतरिनासोबत या लग्नासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहा देखील पोहचला आहे. बादशाहाने आपल्या प्रसिद्ध “चुल” या गाण्यावर कतरिनासोबत डान्स केला. त्याचबरोबर छोट्या पडद्यावरील नागिन मालिकेतील सुरभी ज्योतीने पिंगा या गाण्यावर ठुमका लावला.

Leave a Comment