जीवावर खेळून त्याने वाचवले पुरात बुडणाऱ्या दोन मुलांचे प्राण


चीनमधील दजिशान शहरातील नदीच्या जास्त प्रवाहामुळे पूरस्थिती निर्माण झाली. याच दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने दोन मुलांना वाचवले. हा माणूस इंटरनेटवर हिरो झाला आहे. पूर असल्यामुळे दोन मुले बुडत होती. ते जीव वाचवण्यासाठी मदत शोधत होते. ली यिजुनने ते पाहिले आणि पाण्यात उडी मारली. मुलांना किनाऱ्यावर आणून त्यांचे प्राण वाचवले. ही घटना सोमवारी घडली. पहिल्या मुलाला वाचवल्यानंतर पुन्हा त्याने पाण्यात उडी मारली आणि दुसऱ्या मुलालाही वाचवले.

सोशल मिडियावर ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हे चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार शेअर केले जात आहे. यिजुनने नदीत उडी मारुन मुलांचे जीव वाचवले असे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. ऑनलाइन व्हिडिओ आल्यानंतर हजारों लोकांनी तो पाहिला आहे. ज्याने जीव वाचवलो, तो यिजुन म्हणतो की, त्यावेळी मी जे काही केले तसे कोणीही आपत्कालीन केले असते.

Leave a Comment