कर्नाटकातील शेतकऱ्याने बनवली नारळाच्या झाडावर चढणारी बाईक


नारळ आणि सुपारीची झाडे खुप उंच आणि सरळ असल्यामुळे या झाडांवर चढणे म्हणजे खुप कठिण काम असते. त्यामुळेच शेतकरी यांची शेती करण्यापासून घाबरतात. पण आता या झाडांवर चढणे एकदम सोपे झाले आहे. यावर एक भन्नाट कल्पना कर्नाटकच्या एका 60 वर्षीय शेतकऱ्याने शोधून काढली आहे. या शेतकऱ्याचे नाव के गणपति भट्ट असे आहे. एक मोटार भट्ट यांनी तयार केली आहे. नारळ आणि सुपारीच्या झाडांवर या मोटारीव्दारे चढणे सोपे झाले आहे. कर्नाटकात नारळ आणि सुपारींच्या झाडांवर चढणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्यामुळेच या बाईकचा आविष्कार भट्ट यांनी केला आहे.


या गाडीचे वजन 28 किलो आहे आणि ही गाडी 60 ते 80 किलोमीटरच्या वेगाने झाडावर चढू शकते. एका लीटर पेट्रोलने जवळपास 80 झाडांवर चढण्याची क्षमता या गाडीची आहे. सुपारी आणि नारळांच्या झाडांवर पावसाळ्यात कीड लागते, त्या वेळी किटकनाशकांची फवारणी करावी लागते. किटकनाशक औषधे घेऊन त्या झाडावर चढणे कधी शक्य होत नाही. अशा वेळी या गाडीचा उपयोग नक्कीच होऊ शकतो.

२८ किलो वजन असणाऱ्या या मोटारीमध्ये टू स्ट्रोक इजिंन असून ही मोटार खाली पडून कोणी जखमी होऊ नये यासाठी शॉक अर्ब्सोर्बेर आणि हायर्डोलीक ड्रमचा वापर करण्यात आला आहे. या मोटारीची किंमत ७५००० सांगण्यात येत आहे.

Leave a Comment