टीम इंडियात विश्वविजेता बनण्याची धमक – मायकल हसी


लंडन – टीम इंडियाचा धमाकेदार सलामीवीर शिखर धवन हा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला असून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल हसी यावर प्रतिकिया देताना म्हणाला की, टीम इंडियाला धवनची कमी जाणवणार नाही आणि त्याच्या भारताला फार मोठे नुकसान होणार नाही, कारण भारतीय संघात त्याला पर्यायी खेळाडू उपलब्ध आहेत.

हसी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, धवनचे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणे हे भारतासाठी धक्कादायक असल्याचे मी मानतो. पण प्रतिभाशाली खेळाडूंची भारतीय संघात कमतरता नाही. असे अनेक त्यांच्याकडे खेळाडू आहेत, जे भारताला विश्वविजेते बनवण्याची धमक अंगात ठेवतात. त्यामुळे भारत धवनशिवायही विश्वविजेता बनू शकतो.

Leave a Comment