आणखी एका स्टारकिडचा सोशल मीडियात धुमाकूळ


मागील आणि चालू वर्षात अनेक स्टारकिड्सने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यात काहींना यश मिळाले तर काहींच्या पदरी अपयश आले. त्यातच हे स्टारकिड्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतात. सोशल मिडियावर सुहाना खान, सारा अली खान यांसारख्या हॉटनेसच्या बाबतीत लोकप्रिय असलेल्या स्टार किड्सला मागे टाकत सध्या सोशल मिडियावर अभिनेत्री पूनम ढिल्लाँनची मुलगी पलोमा ठकेरिया ढिल्लाँन आपल्या हॉट फोटोंमुळे धुमाकूळ घालत आहेत.

View this post on Instagram

DO NOT forget to stretchhh ☺️🧘🏻‍♀️

A post shared by Paloma Dhillon (@palomathakeriadhillon) on


आपल्या आईइतकीच पलोमा ही सुंदर असल्याचे तिचे चाहते सोशल मिडियावर बोलत आहेत. इतर स्टारकिड्स प्रमाणे पलोमा सुद्धा सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय आहे. त्याचबरोबर ती आपल्या फिटनेसला घेऊन सोशल मिडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत चालली आहे.


आपल्याला पलोमाचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर कळेल की, आपल्या फिटनेस बाबत ती किती आग्रही आहे. ती वेळात वेळ काढून वर्क आऊट करते. कमालीची सुंदर आणि कमनीय बांधा असलेली पलोमा बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून पलोमाने आपले शिक्षण पुर्ण केले. सोशल मिडियावर तिचे चाहते तिच्या पोस्ट फिटनेस मोटीवेशन म्हणून पाहतात. त्यामुळे जितकी सुंदर तितकीच हॉट असलेली पलोमा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment