सोशल मीडियात आग लावत आहे वाणीचा बिकनी अवतार


अभिनेत्री वाणी कपूर हिने सन 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. वाणी कपूर हिच्यासोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात परिणीती चोप्रा आणि सुशांत सिंह राजपूत हे मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर वाणीने 2014 मध्ये आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला. त्या दरम्यान तिला तमिळ, तेलुगूमधील काही रोमॅंटीक आणि कॉमेडी चित्रपट मिळाले.

View this post on Instagram

Stormy mind and a tranquil ♥️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on


पण वाणी कपूर आता एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियात चर्चेत आली आहे. सोशल मीडियात तिचा वावर अगदी बिनधास्त असतो. या बिनधास्तपणामुळेच ती सोशल मीडियात आपल्या हॉट फोटोने आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. तिने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच काही हॉट फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

Calm is a superpower 😇🌌🧚‍♀️🧿

A post shared by VK (@_vaanikapoor_) on


वाणी या फोटोत ती एका स्विमिंग पुलशेजारी बिकिनी परिधान करुन सन बाथ घेताना दिसते. तिच्या फोटोखाली आलेल्या लाईक्स, कमेंट पाहून तिचा हा बिकिनी अंदाज चाहत्यांना भलताच आवडल्याचे दिसते. सोशल मीडियावर जोरदार कार्यरत असलेल्या वाणी कपूर हिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढच होत असते.

View this post on Instagram

Tropical state of mind 🏝☀️☘️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on


‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातील अभिनयासाठी वाणी कपूर हिला अभिनयाबद्दल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, रणवीर सिंह याच्यासोबत वाणी हिने ‘बेफ्रिके’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट त्यातील किसिंग सीनचा भडीमार असल्यामुळे खूपच चर्चेत होता. या चित्रपटात दोघांची केमेस्ट्री लोकांना आवडली.

Leave a Comment