गुगल पे देत आहे 2000 रुपये जिंकण्याची संधी


आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सध्या सर्वत्र चर्चा असल्यामुळे ‘गुगल पे’चा क्रिकेटद्वारेच युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. आता एक क्रिकेट गेम ‘गुगल पे’ या अॅपवर आला आहे. गुगल ‘तेज शॉट्स’ नावाचा हा गेम खेळून 2 हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. प्रत्येक बॉलवर फटका मारल्यास धावा मिळतील आणि 100 धावा, 500 धावा किंवा त्याहून अधिक स्कोर केल्यास स्पेशल स्क्रॅच कार्ड मिळेल. तुम्हाला सगळ्या धावा एकाचवेळी करायच्या नाहीत, तुम्ही जेव्हाही गेम खेळाल त्यावेळी एकूण धावसंख्या वाढेल.

‘गूगल पे’ हे एक पेमेंट गेटवे अॅप असून युजर्सना याद्वारे कॅशबॅक आणि डिस्काउंट यांसारख्या अनेक ऑफर्स मिळतात. पैसे याच्या मदतीने सहजपणे ट्रांसफर करता येणे शक्य आहे. ‘तेज शॉट्स’ हे अॅप ओपन केल्यानंतर गेम खेळण्यासाठी तुम्हाला सर्वात खालपर्यंत स्क्रोल करावे लागेल. तेथे बनलेल्या ‘तेज शॉट्स’ गेमच्या चिन्हावर टॅप केल्यास गेम सुरू होईल आणि तुम्ही बक्षीस जिंकू शकतात. तुम्ही या गेममध्ये केवळ फलंदाजी करु शकतात आणि जसजशा धावा वाढतील तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळतील. तुम्ही हा गेम जितक्या वेळेस पाहिजे तितक्या वेळेस खेळू शकतात. एकूण धावा वाढल्यानंतर तुम्हा मिळणाऱ्या रिवॉर्ड्समध्येही वाढ होईल. तुम्हाला हा गेम खेळताना बिल पेमेंटसाठी स्क्रॅच कार्ड देखील मिळतील. किती रुपयांचे स्क्रॅच कार्ड आहे हे तुम्हाला स्क्रॅच केल्यानंतरच कळेल. तुम्ही या स्क्रॅच कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यंत पैसे जिंकू शकतात. सर्वप्रथम 100 धावा केल्यानंतर 50 रुपयांपर्यंतचे स्क्रॅच कार्ड मिळते, त्यानंतर 500 धावा झाल्यानंतर दुसरे स्क्रॅच कार्ड मिळेल. यामध्ये 100 रुपयांपर्यंत मिळू शकतात. अशाचप्रकारे 1000, 2000 आणि 3000 धावांसाठी वेगवेगळे स्क्रॅच कार्ड्स मिळतील आणि यातून 2000 रुपयांपर्यंत कितीही रुपये तुम्ही जिंकू शकतात.

Leave a Comment