‘या’ प्रियंकाचे फॉलोअर झाले नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संपर्कात असतात. त्यातच सदैव सोशल मीडियावर सक्रिय असल्याचा एक पुरावा नुकताच समोर आला आहे. भाजपच्या युवा नेत्या प्रियंका शर्मा यांना नुकतेच त्यांनी ट्विटरवर ‘फॉलो’ केले आहे. आता तुम्ही विचाराल की या प्रियंका शर्मा कोण आहेत? तर आम्ही तुम्हाला सांगतो या त्याच प्रियंका आहे ज्यांनी ममता बॅनर्जींचे मीम शेअर करुन चर्चेत आल्या होत्या. प्रियंका यांनी पंतप्रधान मोदी फॉलोअर बनल्यानंतर स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली.

त्यांनी मोदींसारखा फॉलोअर मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केला आहे. प्रियंका यांनी त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये माझ्यासाठी हे सर्वांत मोठे सरप्राईज आहे. नरेंद्र मोदीजी, फॉलो बॅक करण्यासाठी धन्यवाद! मोठा सन्मान आणि गौरव झाल्यासारखे वाटत असल्याचे लिहिले आहे.

सेलिब्रिटीजसह २ हजार १७१ जणांना सोशल मीडियावर सक्रिय राहणारे मोदी ‘फॉलो’ करतात. तर, जवळजवळ ४८.१ दशलक्ष लोक मोदींना ‘फॉलो’ करतात. प्रियंका याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ‘मीम’ शेअर केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांना १० मे रोजी अटकही झाली होती. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मुक्त करण्यात आले होते.


भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० (मानहानी) अंतर्गत प्रियंका याच्यावर आरोप लावण्यात आले होते. प्रियंका यांच्याविरोधात कोलकातामधील स्थानिक तृणमूल नेते विभास हाजरा यांच्या तक्रारीवरून खिलाफ आयटी अॅक्टअंतर्गत तक्रारही दाखल करण्यात आली होती. आपल्या फेसबुक अकाउंटवर प्रियंका यांनी ममता बॅनर्जींचे मीम शेअर केले होते. त्यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या छायाचित्रावर ममता बॅनर्जींचा चेहरा लावला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रियंका यांना सोडण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांनाही प्रियंका याच्या अटकेवर फटकारले होते. प्रियंका यांना लवकरात लवकर सोडून देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. असे न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू होईल, असे म्हटले होते. तरीही प्रियंका यांना सोडून देण्यास १८ तास उशीर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Leave a Comment