बळीराजाने सहा एकरात साकारला ‘जाणता राजा’


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या काहीना काही गोष्टी सतत सोशल मीडियात व्हायरल होत असतात. त्यात त्यांनी केलेले पराक्रम त्याचबरोबर त्यांचे विचार यांचा समावेश असतो. पण सध्या सोशल मीडियात सर्वांनाच अभिमान वाटेल अशी गोष्ट व्हायरल झाली आहे. गुगल मॅपचा एक व्हिडीओ महाराष्ट्रातील बहुतेक लोक सोशल मीडियात शेअर करत आहेत. यात ते एक लोकेशन शेअर करत असून त्यात त्या लोकेशनवर क्लिक केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा आपल्याला दिसून येत आहे.

आम्ही तुम्हाला काही फेक बातमी सांगत नसून हे खरे आहे. मंगेश निपाणीकर या शेतकऱ्याने ही कलाकृती तयार केली असून देशातील ती पहिली ग्रास पेंटींग आहे. लोक ही पेंटींग सोशल मीडियात मॅपच्या माध्यमातून बघत आहेत.

ही पेंटिंग लातूरमधील निलंगा गावात तयार करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शेतात गवत उगवून साकारण्यात आली आहे. शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी हे सगळे करण्यात आले आहे. ६ एकर शेतात मंगेश निपाणीकर यांनी गवत उगवले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा आराखडा तयार करून त्यांनी त्यावर गवत उगवले आणि शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा काही दिवसात समोर आली. सगळेचजण ही कलाकृती बघून हैराण झाले आहेत. ज्यांनी हे गुगल मॅपवर पाहिले ते आश्चर्यचकितच झाले आहेत. याला थ्रीडी इफेक्ट देणण्यासाठी यात ग्राफ्टिंगही करण्यात आली आहे. ही प्रतिमा ७ दिवसात अशी दिसू लागली आहे.

Leave a Comment