डिजीटल प्लॅटफॉर्मवर तुषार कपूर – मल्लिका शेरावतची एन्ट्री


डिजीटल प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी पदार्पण केले असून वेबसिरीजला प्रेक्षकही पसंती देत असल्यामुळे डिजिटल विश्वात अभिनेता तुषार कपूर आणि मल्लिका शेरावत या दोघांनीही पदार्पण केले आहे. त्यांचा कॉमेडी शो ‘अल्ट बालाजी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. नुकताच या कॉमेडी शोचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या कॉमेडी शोचे नाव ‘बो सबकी फटेगी’ असे असून या शोचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. नुकतेच या शोचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. शो ‘हाऊसफुल’ आणि ‘गोलमाल’ सीरिजसोबत हा जुळला गेला असल्यामुळे या शोच्या ट्रेलरमध्ये कॉमेडीचा तडका पाहायला मिळत आहे. २७ जून २०१९ पासून हा शो ‘अल्ट बालाजी’वर स्ट्रिम होणार आहे.

Leave a Comment