राशिद खानची नकोशा विक्रमाला गवसणी


मँचेस्टर – विश्वचषक स्पर्धेतील काल खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलब्दिन नैब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले असले तरी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः पिसे काढली. अशातच, फिरकीपटू राशिद खानच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

राशिद खान विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने ९ षटकांमध्ये तब्बल ११० धावा दिल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एखाद्या फिरकीपटूने शंभरपेक्षा जास्त धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर त्याला कालच्या सामन्यात एकही बळी घेता न आल्यामुळे राशिदची नको त्या कामगिरीसाठी इतिहासात नोंद झाली आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन, जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने ६ गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता.

Leave a Comment