व्हिडीओ- अजब पद्धतीने रनआऊट झाला बांगलादेशचा हा फलंदाज


नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. विंडीजने शाय होप (९६), एव्हिन लुईस (७०) आणि शिमरॉन हेटमायर (५०) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२१ धावांपर्यंत मजल मारली आणि बांगलादेशला ३२२ धावांचे आव्हान दिले होते.

व्हिडीओ पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

बांगलादेशला या आव्हानाचा पाठलाग करताना अर्धशतकी सलामी मिळाली. पण २९ धावांवर सलामीवीर सौम्य सरकार बाद झाला. २ चौकार आणि २ षटकार त्याने लगावले. तमीम इकबाल आणि शाकिब अल हसन यांनी त्यानंतर चांगली भागीदारी केली. पण एका अजब पद्धतीने तमीम इकबाल धावबाद झाला. कॉट्रेलने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले. तमिमने सरळ रेषेत मारलेला फटका थेट कॉट्रेलच्या हातात गेला. कॉट्रेलने काही कळण्याच्या आतच चेंडू स्टंपवर मारला आणि तमीमला धावबाद केले.

Loading RSS Feed

Leave a Comment