दिल्लीतील ‘सतरंगी थाळी’, वजन तब्बल पंचवीस किलो !


एखाद्या जातीच्या खवय्याला भरपेट भोजन कुठल्याही वेळी नकोसे असत नाही. भोजन कुठल्याही प्रकारचे असले, तरी ही खवय्ये मंडळी त्यावर मनापासून ताव मारणार आणि भोजनाचे ताट चाटून पुसून कसे लख्ख करणार ! अशाच जातीच्या खवय्ये मंडळींसाठी दिल्लीतील राजोरी गार्डन भागातील ‘मेलो गार्डन’ नामक रेस्टॉरंटने ‘सतरंगी’ थाळी पेश केली आहे. सर्व अन्नपदार्थ या थाळीमध्ये मांडले गेल्यानंतर या थाळीचे वजन तब्बल पंचवीस किलो भरते ! या राजेशाही ‘सतरंगी’ थाळीचा आकार षटकोनी असून, या मध्ये निरनिरळ्या प्रकारच्या पोळ्या, पुऱ्या, भाकरी, ताक, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, उसळी आणि अर्थातच निरनिराळ्या मिष्टान्नांचाही समावेश असतो. या थाळीचे चार प्रकार रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये असून, त्यामध्ये ‘सतरंगी पंजाबी’ शाकाहारी, ‘सतरंगी पंजाबी’ मांसाहारी, ‘चिंजाबी’ (चायनीज-पंजाबी) शाकाहारी आणि ‘चिंजाबी’ मांसाहारी अशा चार प्रकारांचा समावेश आहे.

View this post on Instagram

What a beautiful sight it is. Tag your gang who would like to have it. . Book the table now in advance if you wish to have it soon. . Satrangi Punjabi Thali aka Hexagon thali will be available from Friday onwards. . For details -7292052000,7292053000 Book now – https://bit.ly/2XxCZY0 . #Repost @travelling_foodiee • • • • • Satrangi Punjabi Thali 😍 . Try this new thali in town at @mellowgardendelhi , Rajouri Garden📍 Satrangi Punjabi Thali has around 30dishes with a weight of 25kgs. Its is priced at Rs. 2000/- for Non-Veg Thali and Rs.. 1600 for Veg Thali all inclusive with unlimited refills. Also 4people can have one thali at a time.😋 . So if you love such thali then don't forget like the post 👍🏻 Also do share with friends and family 😁 . #thali #indianthali #shotononeplus6 #northindianfood #offers #MellowGarden #Rajouri #SocializingFood #foodlover #delhi #delhidiaries #delhifoodblogger #delhifoodie #foodtalkindia #indianfood #indianfoodie #omnomnom #foodphoto #foodphotography #foodbloggers #getinmybelly #eatlocal #eatfamous #eatgood #eathealthy #foodindia #delhifoodies #thali #contest

A post shared by Mellow Garden (@mellowgardendelhi) on


‘कुरकुरे दही कबाब’, ‘तंदुरी चिली चिकन’, ‘अमृतसरी आलू’, ‘पंजाबी कढाई कुंभ’ इथपासून ‘पिंडवाला शाही पनीर’, ‘गोभी मटर अद्रकी’, इथपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ या थाळीमध्ये समाविष्ट आहेत. ही एकच सतरंगी थाळी इतकी भली मोठी आहे, की यामध्ये असलेले पदार्थ चार लोकांसाठी अगदी पोटभरीचे होतात. आणि या थाळीची आणखी एक विशेषता अशी, की ही थाळी ‘अनलिमिटेड’ आहे !, म्हणजेच तुम्हाला हवे असलेले पदार्थ तुम्ही किती ही वेळा मागून घेऊन खाऊ शकता. त्यामुळे परिवारासह भोजनासाठी बाहेर पडणाऱ्या दिल्लीकरांमध्ये ही सतरंगी थाळी चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. एका सतरंगी थाळीची किंमत सोळाशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहे.

Leave a Comment