दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात परतला लुंगी एनगिडी


लंडन – दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीतून पूर्णपणे सावरला असल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील पुढील सामन्यात तो उपलब्ध असणार आहे. १९ जूनला दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात लुंगी एनगिडीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे यापूर्वीच विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असल्यामुळे महत्वाचे २ गोलंदाज संघात नसल्याने आफ्रिकेला यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये बराच तोटा सहन करावा लागला होता.

Leave a Comment