सोशल मीडियात व्हायरल होत आहे जान्हवीचा बॅली डान्स


बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘रुही अफ्झा’या चित्रपटात झळकणार आहे. यासाठी जान्हवी कठोर परिश्रम घेत आहेत. पण सध्याच्या घडीला जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी बॅली डान्स करताना दिसत आहे. प्रत्यक्षात, टिव्हीवर लवकरच डान्स दिवाने 2 हा रिआलिटी सुरु होणार आहे. यात माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि शशांक खेतान हे जज म्हणून काम पाहणार आहेत. त्यांनी जान्हवीला एक डांस चॅलेंज दिले होते, तो तिने पूर्ण केले आहे.


या व्हायरल व्हिडियोमध्ये, जान्हवी कपूर ‘डान्स दिवाने 2’ च्या सिग्नेचर ट्यूनवर बॅले डान्स करत आहे. जान्हवीचा डान्स पाहून ती आपल्या डान्सवर खूप मेहनत करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओला तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील देण्यात आली आहे. जान्हवीने शशांक खेतान यांनी दिलेले डान्स दिवाने चॅलेंज स्वीकारुन पूर्ण देखील केले आहे. जान्हवी कपूरचे चाहते देखील तिच्या व्हिडीओला लाईक आणि प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment