घोड्यावर स्वार होऊन पार्टीत पोहचली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल


हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री पॅरिस हिल्टन ही सोशल मीडियात तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे अनेकदा चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच पॅरिस हिल्टन ही सोशल साइट, मॉडेल, डिझायनर आणि एक उत्कृष्ट गायक आहे. त्याचबरोबर तिला अनेकदा पार्ट्यांमध्ये देखील पाहिले जाते. अलीकडेच, पॅरिस हिल्टनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती एका पार्टीत शानदार पद्धतीने एंट्री करत असल्याचे दिसत आहे. पॅरिस हिल्टनची ही शानदार एंट्री पाहून तेथे उपस्थित अन्य लोक देखील आश्चर्यचकित झाले आणि तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यात व्यस्त झाले. पॅरिस हिल्टनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.


अमेरिकन टेलिव्हिजनवर प्रसिद्ध असलेल्या पॅरिस हिल्टनची पार्टीतल्या एंट्रीमुळे चर्चेत आहे. या पार्टीत ती चक्क पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन आली होती. तिची एंट्री एका राजकुमारीपेक्षा कमी नव्हती, पण लोकांनी त्यावरुन तिची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना पॅरिस हिल्टनने लिहिले आहे की, ‘स्टुडिओ 54 च्या पार्टीत जाण्याचा हा एकमेव होता. व्हिडिओमध्ये, पॅरिस हिल्टन गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये दिसून येत आहे. ज्यामुळे ती अजून खूप सुंदर दिसत आहे. पॅरिस हिल्टनच्या व्हिडीओवर हॉलीवूडची प्रसिद्ध कलाकार निकिता ड्रेगन्स यांनी टिप्पणी केली. फोटोवर टिप्पणी करताना निकिता ड्रेगन्सने ‘आयकॉनिक क्वीन’ असे म्हटले आहे.


यापूर्वी, पॅरिस हिल्टनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तो व्हिडीओ पोस्ट करताना, तिने She has a way with words, pink lipstick & making an entrance असे लिहिले होते. हॉलीवूडचा परिचित चेहरा पॅरिस हिल्टन ‘हाउस ऑफ वेक्स’, ‘विस्मान’ आणि ‘द हॉटी अँड नॉटी’ मध्ये पाहिला गेला आहे. बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये तिला पाहिले गेले आहे. पॅरिस हिल्टन गाणे देखील सुंदर गाते. तिचा एक अल्बम देखील रिलीज झाला आहे. पॅरिस हिल्टन हॉटेलचा मालक कॉनराड हिल्टनची नात आहे.

Leave a Comment