महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिचा वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे तिच्या वर्कआऊट करण्याची जागा आहे. या व्हिडिओमध्ये नव्या नवेली नंदा न्यूयॉर्कमधील रस्त्यावर व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. इंस्टाग्रामवर नव्या नंदाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती व्यायाम करताना दिसत आहे. यावरुन तिला आता ट्रोल करण्यात येत आहे.
नव्या नवेलीच्या वर्कआऊटवर लोक म्हणतात …हे वागणे बरं नव्हं
नेटकऱ्यांचे यावर असे म्हणणे आहे की, नव्या नवेलीने जिमच्या आत जाऊन व्यायाम केला पाहिजे. ज्यासाठी तुम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. तुम्ही का म्हणून आपल्या देशाचे नाव खराब करत आहात. त्याचबरोबर काहींना तिचा हा अंदाज आवडला आहे. नव्याच्या या पोस्टला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नव्या भलेही चंदेरी दुनियापासून लांब असली तरी तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात.
काहीदिवसांपूर्वी जावेद जाफरीचा मुलगा मिझान जाफरी याच्यासोबत नव्या डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मिझान याने यावर स्पष्टीकरण देत आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर आमच्यात कोणत्याही प्रकारचे रिलेशन नसल्याचे म्हटले आहे.