या व्हिंटेज गाण्यावर थिरकले सिंबा आणि लिटील मास्टर


मुंबई – विश्वचषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या हायव्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले होते. भारताने या सामन्यात पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केल्यानंतर अवघ्या देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. सामन्याविषयी चाहत्यांमध्ये रविवारी सकाळपासूनच प्रचंड उत्सुकता होती. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा यामध्ये मागे नव्हते. मँचेस्टरच्या मैदानावर अनोख्या अंदाजात अभिनेता रणवीर सिंह झळकला. सामन्यादरम्यान बॅकस्टेजवर सुनील गावस्कर यांच्यासोबत रणवीर थिरकत होता. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सुनील गावस्कर यांनी रणवीरसोबत ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ या गाण्यावर ठेका धरला. क्रिकेटर हरभजन सिंहने हा व्हिडिओ शूट केला आणि त्याने युट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड केला. सामन्याच्या दरम्यान रणवीरच्या उपस्थितीमुळे उत्साह द्विगुणीत झाला होता. क्रिकेट व बॉलिवूड हे परफेक्ट समीकरण यावेळी चाहत्यांना पाहायला मिळाले.

Leave a Comment