कोहलीचा आणखी एक नवा विराट किर्तीमान


मँचेस्टर – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम भारताचा धडाडीचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीने केला आहे. २३० सामन्यातील २२२ डावांमध्ये खेळताना त्याने हा पल्ला पूर्ण केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे. २८४ सामन्यातील २७६ डावामध्ये खेळताना सचिनने ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. पाकिस्तान विरोधात खेळताना कोहलीने हा विक्रम मोडला आहे.

हा विक्रम करण्यासाठी विराट कोहलीला ५७ धावांची गरज होती. पाकिस्तानच्या विरोधात खेळताना कोहलीने हा विक्रम केला आहे. कोहलीने मागील वर्षी जलद १० हजार धावा करण्याचा विक्रम २०५ डावांमध्ये केला होता. त्यानंतर पुढील १ हजार धावा त्याने फक्त १७ डावांमध्ये पुर्ण केला आहे.

कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. विराटनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिंकी पॉन्टिंगने २९५ सामन्यातील २८६ डावामध्ये खेळताना ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही या विक्रमात सहभागी आहे. गांगुलीने २९५ सामन्यापैकी २८८ डावात खेळताना ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

Leave a Comment