लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी खासदार विनायक राऊत


मुंबई – लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची वर्णी लागली आहे. संसदीय कार्यमंत्र्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याविषयी पत्र दिले आहे.

कोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे मोठे नेते आहेत. रायगडमध्ये माजी केंद्रिय मंत्री अनंत गीते यांचा पराभव झाल्याने शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेते पदाची माळ राऊत यांच्या गळ्यात पडली असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या खासदारांमध्ये या मंत्रीपदावरून नाराजी असल्याचे समोर आले होते. मंत्रीपदाची अपेक्षा असल्याने एका खासदाराने गटनेते पद नाकारले होते. पण, हे नाव कोणते होते हे मात्र समजू शकले नाही. आता विनायक राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment