‘कोका कोला’साठी सनी लिओन शिकत आहे उत्तरभारतीय बोली


लवकरच एका चित्रपटात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओन झळकणार आहे. ‘कोका कोला’ असे या चित्रपटाचे नाव असून हा एक विनोदी भयपट असणार आहे. या चित्रपटाची सनीचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटासाठी सनी फार मेहनत घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित ‘कोका कोला’ हा चित्रपट आहे. आपल्या आगामी चित्रपटातील भूमिकेला न्याय मिळवून देण्यासाठी फार मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी तिने उत्तर भारतीय हिंदी बोली भाषेचे धडे घेण्यास सुरुवात केली आहे.

एखादी गोष्ट जेव्हा माझ्या कामाशी संबंधित असते, मी तेव्हा सर्व नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार असते. मग ती एखादी नवीन भाषाही असो. मला माझी ही मेहनत एक यशस्वी अभिनेत्री होण्यास मदत करते. तसेच नव्या गोष्टी शिकण्यात एक वेगळा आनंद असतो. मी सध्या उत्तर भारतीय यूपीची हिंदी बोली शिकत आहे आणि ती भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सनी सांगते.

गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील या चित्रपटात सनी लिओनसह झळकणार आहे. तसेच खलनायिकेच्या भूमिकेत ती चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारिख अद्याप ठरलेली नाही. परंतु चाहते चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment