आता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’


आजही अक्षय कुमारच्या मोहरा या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आवडीने ऐकले आणि पाहिले जाते. या गाण्याची प्रसिद्धी दोन दशकांहून अधिक काळ उलटला तरी काही कमी झालेली नाही. या गाण्याने नव्वदीच्या दशकात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हे गाणे तितक्याच ताकदीने रवीना टंडनने पडद्यावर उतरवले होते. आता पुन्हा एकदा हे गाणे रिक्रिऐट केले जाणार आहे. या गाण्याचे राइट्स दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी आपल्या आगामी सुर्यवंशी या चित्रपटासाठी विकत घेतले आहेत.

रामोजी फिल्म सिटीमध्ये पुढील आठवड्यात या गाण्याचे चित्रिकरण केले जाणार आहे. या गाण्यांमध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची केमेस्ट्री दिसणार आहे. टिप टिप बरसा पानी हे गाणे बघणाऱ्यांच्या नजरा गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रवीना टंडनवरच खिळल्या होत्या. हे गाणे उदित नारायण आणि अलका याज्ञनिक यांनी गायले होते तर आनंद बक्षी यांच्या शब्दांना विजू शाह यांनी संगीतबद्ध केले होते. आता रिक्रेएट केले जाणारे गाणे कोण गाणार आणि संगीतबद्ध करणार हे आगामी काही काळातच स्पष्ट होईल.

बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीचे ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या चित्रपटांनी अधिराज्य गाजवल्यानंतर आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘सूर्यवंशी’ येणार आहे. त्याच्या या चित्रपटामध्येदेखील अन्य चित्रपटांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात येणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

Leave a Comment