
आपल्यातील प्रत्येकाला कोणता कोणता छंद हा असतोच आणि तो छंद जोपासायचा आपण सर्वेतोपरी प्रयत्न करतो. पण आम्ही आज तुम्हाला एका तरुणीबद्दल सांगणार आहोत जिचा छंद तुम्ही ऐकला तर तुम्ही म्हणाला खरच ग्रेट आहे ती… आम्ही सांगत आहोत त्या तरुणीचे नाव आहे Angela Nikolau. तिला जगातील सर्वात उंच इमारतींवर फोटो काढण्याचा छंद आहे. तसा छंद करणाऱ्या अनेकांनी आपला जीव गमावला आहे आणि तसा ट्रेंड देखील आता सुरु झाला आहे. Rooftopping असे याला म्हणतात.
‘या’ तरुणीला आहे Rooftoppingचा छंद
पण अशा घटनांच्या बातम्या वाचून Angela घाबरत नाही. हे सगळे ती हिंमत करुन करते. जगभरात प्रवास करुन Angela ने वेगवेगळ्या ठिकाणी उंच इमारतींवर फोटो काढले आहेत. तिने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका सर्कसमध्ये Angela काम करते. स्टंट्स करण्याची तिला अजिबात भीती वाटत नाही. मॉस्कोतील एका सर्कसमध्ये तिचे वडील काम करत होते. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला बालपणापासूनच असे कारनामे करण्यासाठी तयार केले आहे.
Angela आता 26 वर्षांची असून ती सांगते की, बालपणापासूनच तिला उंची पसंत आहे. ती सांगते की, तिच्या आजीला जेव्हा हे कळाले की, असे काहीतरी धक्कादायक प्रकार ती करते तेव्हा ती घाबरली होती. पण आजीला तिने हे सांगितले की, हे फोटो एडिट केले आहेत.
उंच इमारतीच्या टोकावर जाऊन Angela केवळ फोटो काढते असे नाही तर तिथे ती योगाही करते. पण हे तुम्ही अजिबात हे ट्राय करु नका. कारण बालपणापासून Angela ने याचे ट्रेनिंग घेतले आहे. तिच्या शरीराची क्षमता तिला माहिती आहेत.
