पाक कर्णधाराची हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी खेळाडूंना ‘तंबी’


नवी दिल्ली – बुधवारी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये ४१ धावांनी पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना येत्या रविवारी भारताबरोबर होणार असून कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यापूर्वी आपल्या खेळाडूंना ‘तंबी’ दिली आहे. भारताविरुद्धच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात कोणताही बहाणा चालणार नसल्याचे त्याने खेळाडूंना सांगितले आहे.

कर्णधार सर्फराजने ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या सामन्यानंतर बोलताना सांगितले की, या सामन्यात आम्ही सगळ्याच क्षेत्रात चुका केल्या. संघाच्या क्षेत्ररक्षणावर मी निराश आहे. पण आम्हाला भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी सुधारण्याची आवश्यकता आहे. आम्हाला यासाठी कष्ट घेण्याची गरज असून भारतासोबतच्या सामन्यात कोणतीही सबब चालणार नसल्याचे, त्याने सांगितले.

पाकिस्तानने आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये ४ सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला आहे तर २ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर राहिलेला एक सामना पावसामुळे होऊ शकलेला नाही. पाकिस्तानचा पुढील सामना १६ जूनला भारताशी होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने आपल्या खेळाडूंना ‘तंबी’ दिली आहे.

Leave a Comment