गुगलच्या सीईओंची विश्वचषकाबाबत भविष्यवाणी


नवी दिल्ली – सद्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लड आणि वेल्समध्ये सुरु असून विजयासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करत आहे. अनेक दिग्गजांनी ही स्पर्धा कोण जिंकणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यातच आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही आपला अंदाज व्यक्त केला आहे.

या स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लडमध्ये व्हावा आणि तो सामना भारतीय संघाने जिंकावा, अशी इच्छा सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे. आपण देखील क्रिकेट चाहते असल्याचेही त्यांनी सांगितले. यूएसआयबीसीचे अध्यक्ष निशा बिस्वाल यांनी वॉशिंग्टन प्रेक्षकांसमोर स्पर्धेतील अंतिम सामना कोणामध्ये होईल असे तुम्हाला वाटते? असे पिचाई यांना विचारले. त्यांनी त्यावर भारत आणि इंग्लड या संघामध्ये सामना व्हावा असे सांगितले. सद्या विश्वचषक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी करावी, अशी आपेक्षाही पिचाई यांनी व्यक्त केली.

Leave a Comment