जेव्हा बॅटने दीपिका रणवीरला झोडपते…


अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची जोडी ऑनस्क्रिन केमेस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिकाची रणवीरच्या ‘८३’ या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी एन्ट्री झाल्यामुळे आता रिल लाईफमध्येही दीपवीरची रिअल लाईफ जोडी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे


१९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाची कथा ‘८३’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे. तर, कपिल देव यांची पत्नी रोमी यांची भूमिका दीपिका साकारणार आहे.


सेटवरचे काही फोटोदेखील रणवीर सिंहने शेअर केले आहेत. माझ्या पत्नीशिवाय माझ्या पत्नीची भूमिका कोण चांगली साकारू शकेल, असे त्याने या फोटोवर कॅप्शन दिले आहे. तर, आणखी एक व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. दीपिका रणवीरला या व्हिडिओत बॅटने मारताना दिसत आहे. माझी रिल आणि रिअल लाईफची कथादेखील अशीच असल्याचे मजेदार कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.


आत्तापर्यंत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटात रणवीर-दीपिकाने एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचीही पसंतीही मिळते. आता दोघांनाही पुन्हा एकदा ‘८३’ चित्रपटात एकत्र पाहता येणार आहे.

Leave a Comment