विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयला धवनच पाहिजे!


लंडन – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकणारा भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांना धवन मुकणार आहे. आता त्याच्या जागी पर्यायी खेळाडूंच्या चर्चेला उधाण आले होते. पण भारतातून धवनच्या बदली कोणता खेळाडू येणार याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे बीसीसीआयला धवनच पाहिजे असेच दिसून येत आहे.

यासंदर्भात बीसीसीआयने म्हटले आहे की, सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली शिखर धवन आहे. तो दुखापतीच्या काळात भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्येच थांबेल आणि त्याच्या प्रकृतीवर व दुखापतीवर बीसीसीआय देखरेख ठेवेल असा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment