भारत-ऑस्ट्रलिया सामन्यादरम्यान माल्ल्याचे चोर म्हणून स्वागत


नवी दिल्ली – भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला पळपुटा मद्यसम्राट विजय माल्ल्या विश्वषक स्पर्धेत लंडनच्या ओव्हलवर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेला सामना पाहण्यासाठी पोहचला होता. त्यावेळी माल्ल्या याच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला असता, सामना पाहण्यासाठी आल्याचे माल्ल्या याने सांगितले. माल्ल्या याने याआधीही अनेकदा भारताच्या क्रिकेट सामन्यांना उपस्थिती लावली होती. दरम्यान भारतीय क्रिकेटप्रेमींकडून त्याचे चोर म्हणून स्वागत करण्यात आले.

माल्ल्या सध्या लंडनमध्ये असून भारतात त्याला आणण्यासाठी प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे. भारतीय बँकांचे माल्ल्याने ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे. ईडी आणि सीबीआयकडून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रत्यर्पणाविषयी विचारणा केली असता माल्ल्या याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Leave a Comment