अॅडम झम्पाची चेंडूसोबत संशयास्पद कृती


लंडन – विश्वचषक स्पर्धेतील काल खेळवल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा या व्हिडिओत चेंडूसोबत संशयास्पद कृती करताना दिसत असल्याने क्रिकेट विश्वासह सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. पण आयसीसीकडून अद्याप या प्रकरणात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांवर एका वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात १२ महिन्यांची तर कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अ‍ॅडम झम्पाच्या या कृत्यामुळे उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.

Leave a Comment