अॅमेझॉनच्या अलेक्सा हत्या प्रकरणाच्या सुनावणीत साक्षीदार


बर्लिन – आजवर तुमची सहायक म्हणून अमेझॉनच्या व्हाइस अॅक्टिव्हेडेट काॅम्प्युटर अलेक्सा काम करत होती. पण तिला जर्मनीतील एका हत्या प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावले जाऊ शकते. तिला पाठिंबा देण्याची योजना जर्मनीची चान्सलर अंगेला मर्केल यांचे गृह मंत्रालय आखत आहे. सुरक्षा सर्व्हिस दहशतवाद व हत्येप्रकरणातील संशयिताविरोधातील प्रकरणे दाखल करण्याच्या पद्धतीवर काम करते आहे. या योजनेनुसार, इंटरनेटशी संबंधित थर्मोस्टेट, कार, स्मार्ट स्पीकर व फ्रीज यासारख्या उपकरणापासून डिजिटल ट्रेस (पुरावे) गोळा करायचे आहेत. गुन्हेगारांना न्यायालयात खेचण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक फूटप्रिंटचा वापर कसा करायचा, यासंदर्भात पुढील आठवड्यात जर्मनीचे मंत्री चर्चा करणार आहेत. भडकाऊ वक्तव्यांचाही यात समावेश असेल अथवा त्या काळात कोणी संशयित घराबाहेर पडला होता का? याची तपासणी होणार आहे.

हॉर्स्ट सिहोफर यांचा प्रस्तावाला पाठिंबा आहे. गृह मंत्रालय मर्केल कंझर्व्हेटिव्ह सांभाळतात. पण त्यांच्या सामाजिक डमोक्रॅट आघाडीचे सहकारी यास विरोध करत आहेत. आपले लोक आपल्या या निर्णयामुळे आपल्याच घरात बदनाम होतील, असा त्यांचा आरोप आहे.

Leave a Comment