विवाहित पुरुषांशी लग्न करूनही यशस्वी ठरल्या या अभिनेत्री


हिंदी सिनेसृष्टीत कधी काय होईल याचा नेम नाही. क्षणात कुणाची तार कुणाशी जुळेल, तर कुणाचे ब्रेकअप होईल. पण बॉलीवूडसाठी आता काही नवीन नाही. पण बॉलीवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटीत अथवा विधुर व्यक्तीशी लग्न केले आहे. यात विशेष म्हणज या अभिनेत्रींचे ते पहिलेच लग्न होते. अशा अभिनेत्रींची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

2012मध्ये अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान लग्नाच्या बेडीत अडकले आणि आता तैमुर नावाचा एक मुलगा सुद्धा त्यांना आहे. पण सैफची करिना ही दुसरी पत्नी आहे. सैफने याआधी 1991मध्ये अमृता सिंह सोबत लग्न केले होते, पण त्यांचा 2004मध्ये घटस्फोट झाला. सैफला अमृतापासून सारा आणि इब्राहिम अशा दोन मुले आहेत.

1979 मध्ये अभिनेत्री हेमा मालिनीशी अभिनेता धर्मेंद्र यांनी लग्न केलं. पण त्यांचे लग्न त्याआधी प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. धर्मेंद्र आणि हेमा यांना इशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत.

बोनी कपूर यांच्या अभिनेत्री श्रीदेवी दुसऱ्या पत्नी होत्या. मोना कपूर असे बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव असून अंशुला आणि अर्जुन अशी दोन मुले त्यांना आहेत. तर श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खूशी या दोन मुली आहेत.

प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राशी 2009मध्ये शिल्पा शेट्टीने लग्न केले असून विहान हा या दोघांचा एक मुलगा आहे. फार कमी लोकांना माहित आहे की शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राजच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता असून तिच्यापासून त्याला देलिना ही 12 वर्षांची मुलगी आहे.

सध्या बॉलिवूडमधील अभिनेता आमिर खान आणि किरण राव ही यशस्वी जोडी आहे. पण किरण ही आमिरची दुसरी पत्नी आहे. आमिरने याआधी रिना दत्ताशी लग्न केले होते, पण किरण आणि रिना एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.

Leave a Comment