विवाहापूर्वी काय करीत होत्या या प्रसिद्ध क्रिकेटपटूंंच्या पत्नी ?


भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नींना आपल्या देशामध्ये सेलिब्रिटी स्टेटस लाभलेले आहे. एखाद्या बॉलीवूड स्टार प्रमाणेच याही मंडळींचे खासगी आणि व्यावसायिक आयुष्य सतत प्रसिद्धीच्या झोतामध्ये असून, यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच पहायला मिळत असते. अशा या सेलिब्रिटी क्रिकेटपटूंशी विवाह बद्ध झाल्यानंतर यांच्या पत्नींना देखील सेलिब्रिटी स्टेटसची सवय अंगवळणी पडत असते. पण या क्रिकेटपटूंशी विवाहबद्ध होण्यापूर्वी या ‘सेलिब्रिटी पत्नींचे’ आयुष्य कसे होते, त्या कोणत्या व्यवसायात कार्यरत होत्या, हे जाणून घेऊया.

क्रिकेटपटू सुरेश रैना याची पत्नी प्रियांका चौधरी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असून, अनेक समाजसेवी उपक्रमांमध्ये प्रिया सहभागी होत असते. तर हरभजन सिंहची पत्नी गीता बसरा विवाहापूर्वी एक नामांकित मॉडेल म्हणून ओळखली जात असे. गीताने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. रितिका साजदेह ही विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून कार्यरत असून, रितिका, क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी आहे. आजच्या काळामध्ये अनेक नामांकित क्रीकेटपटूंसाठी रितिका स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करीत आहे.

भारतीय क्रीकेट संघाचा पूर्व कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज मेहेंद्र सिंह धोनी याची पत्नी साक्षी हिने औरंगाबाद येथून हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. क्रिकेटपटू युवराज सिंहची पत्नी हेझेल कीच मूळची ब्रिटीश-मॉरीशियन असून, युवराज सिंहशी विवाह होण्यापूर्वी हेझेल मॉडेलिंग करीत होती. तिने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. तसेच छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही हेझेल झळकली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा जागतिक लोकप्रियतेची बॉलीवूड अभिनेत्री आणि निर्माती आहे. अनुष्काने आपल्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली असून, तिच्या खाती अनेक यशस्वी चित्रपट जमा आहेत.

Leave a Comment