आयसीसीची धोनीच्या त्या ग्लोव्हजवरील बंदी कायम


दुबई – ५ जुलै रोजी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात बलिदान बॅजचे चिन्ह असलेले ग्लोव्हज महेंद्रसिंह धोनीने वापरले होते. ही बाब आयसीसीच्या लक्षात आल्यानंतर बीसीसीआयला धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह हटवायला आयसीसीने सांगितले होते.

बीसीसीआय प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आयसीसीकडे धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह कायम ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. पण याला आयसीसीने नकार दिल्यामुळे, बलिदान बॅजचे चिन्ह असलेले ग्लोव्हज घालून धोनीला पुढील सामन्यात खेळता येणार नाही.

कोणत्याही प्रकारचा खासगी प्रचार प्रसार आयसीसीच्या स्पर्धेत करण्यास परवानगी नाही. या नियमाचे धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह उल्लंघन करते. याबाबत मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत एका सदस्याने याबाबत परवानगी मागण्यासाठी सांगितले होते. यामुळे, आयसीसीने परवानगी दिल्यानंतर धोनीला चिन्ह वापरण्यास मिळेल.

याबाबत आयसीसीचे अधिकारी क्लेअर फर्लोंग यांनी म्हटले होते, की कोणत्याही राजकीय आणि धार्मिक बाबीशी बलिदान ब्रिगेड चिन्ह निगडीत नसल्याचे बीसीसीआयने पटवून दिल्यास धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह कायम राखण्याच्या परवानगीवर विचार केला जावू शकतो. बलिदान बिग्रेडचे चिन्ह हे फक्त पॅरा मिलिटरी कमांडोच वापरू शकतात. आम्ही बीसीसीआयला हे चिन्ह हटवण्यासाठी सांगितले आहे.

Leave a Comment