स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’चा ट्रेलर रिलीज


नुकताच मुंबईत स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि म्युजिक लाँच सोहळा पार पडला. या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट यावेळी उपस्थित होती. या चित्रपटाची कथा आई मुलगा आणि त्याच्या आयुष्यात आलेली एक नवीन स्त्री यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे.

श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट येत्या १४ जूनला रिलीज होणार आहे. नातेसंबंधांवर भाष्य करणारी अशी ही एक कथा आहे. स्वप्नील जोशी हा पहिल्यांदा सचिन मोटे लिखीत या चित्रपटात एका नॉन ग्लॅमरस अशा भूमिकेत दिसणार आहे. तो आपल्याला डोळ्यापुढे चालणारा सरळमार्गी सुनील कुलकर्णीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. याशिवाय सई देवधर या मराठीत पहिल्यांदाच पदार्पण करत आहे. या दोघांशिवाय अभिनेत्री नीना कुलकर्णी यादेखील या चित्रपटात सुनीलच्या आईच्या भूमिकेत दिसतील.

या चित्रपटात समिधा गुरू, विघ्नेश जोशी, आशिष पाठक, संयोगीता भावे, दीप्ती भागवत, मिलिंद पाठक, सुहिता थत्ते, असे तब्बल २३ कलाकार काम करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे या चित्रपटात स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गायक रोहित राऊत हा या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच संगीत दिग्दर्शक म्हणून समोर आला आहे. शंकर महादेवन यांनी चित्रपटातील एक गाणे गायले आहे. तर, दुसरी गाणी गजल गायिका बेला शेंडे आणि रोहित यांनी मिळून गायली आहे. साध्या माणसांची साधी गोष्ट पहायची इच्छा असेल तर ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल, अशी ग्वाही या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने दिली आहे.

Leave a Comment