जिओच्या ग्राहकांना पाहता येणार विश्वचषकाचे सर्व सामने आता अगदी मोफत


सध्या क्रिकेट जगतात विश्वचषकाचा ज्वार चढलेला आहे. त्याचनिमित्ताने टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्याकडे अन्य ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जिओने क्रिकेट विश्वचषकाच्या सर्व सामन्यांचं प्रसारण आपल्या ग्राहकांना लाइव्ह पहाता यावे यासाठी हॉटस्टारशी भागीदारी केली आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना याअंतर्गत क्रिकेट विश्वचषकाचे सर्व सामने स्मार्टफोनवर पहाता येणार आहेत. ही सेवा जिओकडून पूर्णतः मोफत पुरवण्यात येणार आहे.

क्रिकेट विश्वचषकातील सर्व सामने रिलायन्स जिओच्या जवळपास 23 कोटी ग्राहकांना आता अगदी मोफत आणि लाइव्ह पहाता येणार आहेत. हॉटस्टार अॅप यासाठी डाउनलोड करावे लागेल. कारण, जिओ टीव्ही अॅपवर सामने पहाण्यासाठी तुम्हाला आपोआप तुम्हाला हॉटस्टार अॅपवर पोहोचवले जाते. जिओने याशिवाय जिओ क्रिकेट प्ले अलाँग हा गेम आणला आहे. युजर्सचे सामन्यादरम्यान मनोरंजन व्हावे यासाठी हा गेम जिओने आणला असून यामध्ये क्रिकेटसंबंधित काही प्रश्न विचारले जातात. तसेच जिओकडून 251 रुपयांच्या प्लॅनची घोषणा करण्यात आली असून यामध्ये 51 दिवसांसाठी एकूण 102 जीबी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळतो. संपूर्ण विश्वचषकाचे सामने पहाण्यासाठी इतका डेटा पुरेसा राहिल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment