देशभरात ईदचा उत्साह, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून शुभेच्छा


नवी दिल्ली – आज देशभरात ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देशातील मुस्लीम बांधवांनी ईदच्या मुहुर्तावर एकत्र येत नमाज पठण केले. तसेच गळाभेट घेत एकमेकाना शुभेच्छा दिल्या.

ईद सणाने रमजान महिन्याचा शेवट होतो. रमजान महिन्यातील २९ वा रोजा मंगळवारी होता. रात्री इफ्तारी संपताच चंद्राचे दर्शन झाल्याने मुस्लीम बांधवांनी ईद साजरी करण्यास सुरूवात केली. दिल्लीतील जामा मशीद, अजमेर येथील शाह जमाल मशीद तर मुंबई येथील हमिदीया मशिदीत मुस्लीम बांधवांनी ईद साजरी केली. लहान-मोठ्यासंह सर्व जण आज एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत.

ईद येताच बाजारपेठांत जोरदार तयारी होते. सर्वांनी नविन वस्त्र परिधान करून शिरखुर्मा आणि ईतर मिठाई वाटत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईदला ईद-उल- फीत्र, असे संबोधण्यात आले. फीत्रचा अर्थ दान, असा होतो. या दिवशी मुस्लीम बांधव दानधर्म करत अल्लाहकडे प्रार्थना करतात.

मोदी सरकारचे 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना ईदच्या निमित्ताने मोठे गिफ्ट
ईदच्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठे गिफ्ट दिलं आहे. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळवून देणार असल्याचे मोदी सरकारने सांगितले आहे. यासंदर्भात केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतल्यानंतर प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा मुस्लिम समुदायातील 5 कोटी मुस्लिमांना लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे.

Leave a Comment