जसप्रीत बुमराहची आफ्रिकेविरुद्ध लढतीआधी डोप टेस्ट


विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या लढतीची तयारी भारत करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सोमवारी वाडाकडून डोप टेस्ट करण्यात आली. भारतीय संघाचा सराव रोज बाऊल स्टेडियमवर सुरु असताना बुमराहला डोप टेस्टसाठी उत्तेजक नियंत्रक अधिकारी घेऊन गेले.

दोन प्रकारची ही टेस्ट होती. बुमराहची पहिल्या राऊंडमध्ये आधी युरीन टेस्ट करण्यात आल्यानंतर जसप्रीत बुमराहचे ४५ मिनिटांनी रक्ताचे नमुने घेण्यात आले. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संस्था वाडाकडून क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी केली जाते. जसप्रीत बुमराहची उत्तजेक द्रव्य चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताला बीसीसीआयमधील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. आणखी अन्य कुठल्या खेळाडूची अशीच चाचणी होणार आहे का? ते बीसीआयमधील सूत्रांनी सांगितलेले नाही.

Leave a Comment