विराटचा हूबहु मुशर्रफची लोकप्रियता शिगेला


सध्या वर्ल्ड कपची धमाल सुरु आहे. त्यात टीम इंडियाचा कप्तान विराटकडे सर्व क्रिकेट चाहते आशेने पाहत आहेत. आणि बिहारशरीफ मध्ये राहणारा मुशर्रफ जेथे जातोय तेथे प्रचंड लोकप्रिय बनतो आहे. आता नालंदाच्या बिहार शरीफ चा मुशर्रफ आणि विराट यांचा काय संबंध असे तुम्हाला वाटेल. पण हा मुशर्रफ हूबहु म्हणजे तंतोतंत आपल्या विराट सारखा दिसतो. अगदी विराटची डुप्लिकेटच. त्यामुळे तो क्रिकेट मैदानावर दिसला कि लोक त्याला खरा विराट समजून त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.

मुशर्रफला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. त्याची अंगकाठी, चेहरामोहरा अगदी विराटसारखा आहे. तो जेथे सामना खेळायला जातो तेथे त्याच्याभोवती लोक विराट समजून गर्दी करतात आणि त्याचे विराटशी असलेले साम्य पाहून मुशर्रफचे फॅन होतात. त्यामुळे एकदा कोलकाता येथे सामना पाहून बाहेर पडताना त्याची चांगलीच गोची झाली होती. मुशर्रफला विराटची प्रत्यक्ष भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे आणि त्याचबरोबर त्याला विराट सारखे उत्तम क्रिकेट खेळून त्याच्या गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. मुशर्रफची आई बिल्किसबानो हिची सुद्धा अशीच इच्छा आहे.

मुशर्रफला वडील नाहीत. तो आणि त्याची आई एक रेडीमेडचे दुकान चालवितात आणि मुशर्रफवर लहान भावंडांची जबाबदारी आहे. तो विराट सारखा दिसतो याची जाणीव झाल्यावर त्याने त्याचे अनेक फोटो फेसबुकवर टाकले आणि पाहतापाहता त्याला अनेक लाईक मिळाले आहेत. मुशर्रफ म्हणतो मी फेसबुकवर माझा फोटो टाकला कि लगेच त्याची विराटशी तुलना होते आणि रोज त्यावर शेकडो कॉमेंट येतात.

Leave a Comment