अवघ्या 27 वर्षांच्या या तरुणीने आजतागायत केली १९६ देशांची भटकंती


जगभ्रमंती करणे हे आपल्यापैकी बहुतेकांचे स्वप्न असते. पण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे त्याला भटकंतीची संधी मिळतेच असे नाही. मात्र एक युवती अशीही आहे, जिने वयाच्या अवघ्या सत्त्वीसाव्या वर्षीच सर्वाधिक देशांमध्ये भ्रमंती करण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. जगातील १९६ देशांमध्ये पर्यटन केलेली ही जगातील एकमेव महिला आहे. कॅसी दे पेसोल असे या अमेरिकन युवतीचे नाव असून, जगातील बहुतेक सर्वच देशांना कॅसीने भेट दिलेली आहे. किंबहुना २०१५ सालाच्या नंतर कॅसीने तब्बल १८१ देशांमध्ये भ्रमंती केली आहे. आजतागायत कॅसीचे पर्यटन सुरूच आहे.

कमीत कमी वेळामध्ये सर्वाधिक देशांना भेट देणारी पर्यटक ठरण्याचा विक्रम स्वतःच्या नावे व्हावा यासाठी कॅसीने चाळीस दिवसांमध्ये तब्बल पंधरा देशांची भ्रमंती केली. कॅसी करीत असलेल्या देशो-देशीच्या पर्यटनाच्या मागे एक खास उद्देशही आहे. निरनिरळ्या देशांना भेटी देणारी कॅसी केवळ एक पर्यटक नाही, तर ‘इंटरनॅशनल पीस थ्रू टूरिझम’ या संस्थेची शांतीदूतही आहे.

कॅसी आपल्या पर्यटनाचे अनेक अनुभव आपल्या ब्लॉग द्वारे आणि त्या त्या देशांतील अनेक सुंदर ठिकाणी टिपलेल्या छायाचित्रांच्या द्वारे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करीत असते. यामध्ये एखाद्या देशामध्ये पर्यटनाच्या वेळी तिला आलेले चांगले-वाईट अनुभव, तेथील लोक कसे, परंपरा कशा, रीती-रिवाज कसे, याचे अनेक अनुभव कॅसी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करीत असते.

Leave a Comment